डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 नमस्कार मित्रहो आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

१३२ व्या जयंतीनिमित्त महामानवास मानवंदना..!! 

हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. यांच्या बद्दल बोलेल तेवढे कमीच आहे अशा  महामानवास परत एकदा मानवंदना

        14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.  १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी केली जाते.

            डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त  विशेष अभिवादने केली जातात,


भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त टपाल तिकिटे काढले होते. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.

इ.स. १९९० मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची १००वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ आंबेडकरांची प्रतिमा असलेले एक रुपयाचे नाणे काढले होते. आंबेडकरांची १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ₹१० आणि ₹१२५ ची नाणी २०१५ मध्ये निघाली होती.. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.

इ.स. २०१५ मध्ये, गुगलने आंबेडकरांच्या १२४व्या जयंती निमित्त आपल्या 'गूगल डूडल' वर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते. तीन खंडातील सात देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते. हे डूडल भारत, आर्जेन्टिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम मध्ये दाखवले गेले होते.

इ.स. २०१७ मध्ये, महाराष्ट्र राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस "ज्ञान दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.

अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इ.स. २०१६, २०१७ व २०१८ या तीन वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे.

इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.

६ एप्रिल २०२० रोजी, कॅनडामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा 'समता दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कॅनडा येथील ब्रुनाबे या शहरातील महापालिकेने घेतला असून त्यासंदर्भातील आदेश तेथील महापालिका प्रशासनाने महापौर माईक हेरले यांच्या सहीनिशी काढले होते. त्यानंतर तेथे आंबेडकर जयंती 'समता दिन' म्हणून पाळण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कॅनडातल्या ब्रिटीश कोलंबियातर्फे, 'वर्ल्ड साइन ऑफ इक्वालिटी' अर्थात 'समतेचं जागतिक प्रतीक' हा सन्मान जाहीर झाला आहे. तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कॅनडात 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पण्या