शिवनेरी किल्ला माहिती -- Shivneri Fort Information in Marathi

                 नमस्कार मित्राहो आज पासून मी एक नवीन ब्लॉग चालू करत आहे आज आपण बगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला  शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते शिवनेरी किल्ला पुण्यापासून सुमारे 105 कि.मी. अंतरावर आहे. शिवनेरी किल्ला 300 मीटर उंच टेकडीवर वसलेला आहे, तुम्हाला पाहण्यासाठी सात वेशी ओलांडाव्या लागतात. त्यावेळी या किल्ल्याची सुरक्षा किती चांगली होती हे या किल्ल्याच्या वेशी दर्शवितात. शिवनेरी किल्ल्याचे सर्वात विशेष आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांची त्यांच्या आई सोबत असलेली मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यातच झाला, ज्यांनी नंतर इतिहासाच्या पानांत आपले नाव नोंदवले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा




शिवनेरी किल्ल्या चा  इतिहास :-

                जुन्नर म्हणजे जर्ना नगर. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे जेथे शाक राजवटीचे राज्य होते. जुन्नरच्या सभोवतालच्या डोंगरावर 100 हून अधिक लेण्या आहेत, त्यातील एक शिवनेरी किल्ला आहे. ज्या डोंगरावर हा किल्ला बांधला गेला आहे त्या डोंगराला खूप मोठ्या खाडीने संरक्षित केले आहे आणि म्हणूनच हा किल्ला बांधण्यासाठी सर्वात योग्य जागा होती. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला 

        पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते.18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते.अशी नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली. 

 

शिवनेरी किल्ल्यावर कसे पोहोचाल :-

पुणे हे प्रमुख स्थान आहे, येथून शिवनेरी किल्ल्यावर जाता येते.

रस्त्या मार्गे: पुणे शहर ते शिवनेरी हे अंतर सुमारे 95 किमी आहे. पुणे आणि भारतातील मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर आणि गोवा या विविध शहरांमध्ये एसटी आणि खाजगी सेवा नियमितपणे चालू असतात. जुन्नरच्या मार्गावरून एक बस जाऊ शकते. पुण्यातून किल्ल्यापर्यंत टॅक्सी किंवा अन्य भाड्याने वाहने घेता येतात.

रेल्वेमार्गाने: पुणे रेल्वे स्टेशन शिवनेरी जवळचे स्टेशन आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि अनेक शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. गडावर जाण्यासाठी आपण स्टेशनवरून बस किंवा टॅक्सी पकडू शकता

विमानाने: पुणे-लोहेगाव विमानतळ शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे.

शिवनेरी किल्ल्यामध्ये प्रवेश शुल्क नाही, पर्यटकांसाठी ही पर्यटन स्थाने पूर्णपणे विनामूल्य आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च हा शिवनेरी किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे, जो पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.

 

 

शिवनेरी किल्ला  सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि मित्र परिवारा मध्ये नक्की शेअर करा
 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा